वाटे , सहवासात फुलावे कायम
सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : पद्मावर्त
लक्षणे : गागागागा गागागागा गागा
वाटे , सहवासात फुलावे कायम . .
भटका कोण ऋतू धरतो इतका दम ?
घुमतील तुझ्या आगेमागे लाखो . .
पण , साथीला कोण मिळे माझ्यासम ?
नक्षीदार तुझ्या बर्चीने केला
हृदयावर हा वार किती हृदयंगम !
तुमचे शाप कसे यावे ऐकाया ?
ऐका , हे माझ्या विजयाचे पडघम !
हे कुठले जुळलेले अभिनव रस्ते ?
हा सुकलेल्या दोन नद्यांचा संगम !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा