वसंत नयनांत तू भरत जा . .
वृत्त : जलोद्धतगती
गण : लगालललगा लगालललगा
वसंत नयनांत तू भरत जा . .
उदासपण दूर घालवत जा !
जिवंत नवरंग होत उडती . .
धरून फुलपाखरू बघत जा !
फुलांस इतका सुगंध कसला ?
लतांस , गवतांस हे पुसत जा.
किती नितळ हा झरा झुळझुळे !
लयीत अपुल्या असा जगत जा !
तरूंवर नवी फळे लहडली . .
सलाम सॄजनास त्या करत जा !
जसे सह़ज पाखरू किलबिले ,
तसे मधुर गीत तू म्हणत जा !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा