माणसात ‘ व्यापार्‍याला ‘ पाहून घेतले

मात्रावृत्त : चंद्रकला
लक्षणे : एकूण मात्रा २४ किंवा २५ .
( l प l + , उ l प l + )
प म्हणजे एकूण ८ मात्रा .
+ म्हणजे निश्चित गुरू .
उ म्हणजे ४ किंवा ५ मात्रा .

छंदोरचना पृष्ठ क्र. ३६३

माणसात ‘ व्यापार्‍याला ‘ पाहून घेतले . .
तोंड त्या फुलांनी अपुले झाकून घेतले !

मी न शब्द मातीसाठी कोठेच टाकला . .
फक्त नभापाशी सूचक बोलून घेतले !

दाते असूनहे सारे गरजू तरी किती !
जे मला दिले ते त्यांनी मागून घेतले .

राहिल्या हिशेबी जेव्हा कोठेतरी चुका ,
मित्र खरेखोटे पण मी मोजून घेतले !

घोट हा विषाचा दाहक नाही मला नवा . .
कालकूटही मी आधी प्राशून घेतले !

ते अता कराया बसले कविता जगावरी . .
केवढे मनाला त्यांनी लावून घेतले !

प्रतिक्रिया टाका