लाख असता चांदण्या . .

मात्रावृत्त : मध्यरजनी

 

लाख असता चांदण्या , का रात्र अंधारीच आहे ?
सोबती झाले तरी मी आज एकाकीच आहे !

 

प्रेम मी केले तरी हे घोकणे जमलेच नाही . .
‘ माझियासाठीच तू . . अन् मी तुझ्यासाठीच आहे ! ‘

 

तूच आलेली . . कसे हे बंद दरवा़ज्यास कळते ?
आजही त्याला तुझी ती ओळखीची टीच आहे !

 

तीर्थयात्रेच्या न गेलो मी कधी वाटेससुद्धा . .
ज्या ठिकाणी माय माझी ती मला काशीच आहे !

 

तेच रामायण अताही घडतसे . . व्यक्ती निराळ्या . .
ज्यास तू भुललीस तो हा मृग नव्हे . . मारीच आहे !

 

.

प्रतिक्रिया टाका