रूबाई – एक परिचय – लेखक – श्री.राम पंडित

रूबाई – एक परिचय –  लेखक – श्री.राम पंडित

रूबाई हा काव्यप्रकार उस्ताद रुदकी ह्या काव्यजाणकाराने प्रचलित

केला. रूबाई विविध रागांमध्ये गायली जाते त्यामुळे तिला

“तराना ” हे देखील नाव आहे. रूबाईमध्ये फक्त दोन शेर

म्हणजे “बैत” असतात म्हणून हिला ” दो बीती ” असेही

म्हणतात. रूबाईच्या चार चरणांपैकी 
पहिल्या , दुसर्या व

चौथ्याचरणात रदीफ व काफिया ( अंत्ययमक व यमक ) असतो.

पण रूबाईच्या चारही चरणाचेवृत्त (वजन ) एकच असावे असा

निर्बंध नाही. रूबाईचे चार चरण वेगळ्यावेगळ्या वजनात असू

शकतात . मात्र चारही अरण एकाच वृत्तात असणे उचित ठरते.

उस्ताद रुदकी आपल्या युगातील श्रेष्ठ विद्वान होते. त्यांनी

उर्दू बहर हजजचा अभ्यास करताना रूबाईचे एकूण २४ वृत्त तयार

केले. या चोवीस वृत्ताव्यतिरिक्त अन्य वृत्तांत रूबाई लिहिली

जात नसे. लिहल्यास तिला रूबाई न म्हणता ” कतअ” असे

संबोधले जातेवर सांगितल्याप्रमाणे रूबाईए चार चरण विभिन्न

वृत्तात जरी असले तरी या चोवीस वृत्तांपैकीच एक  अथवा

चार वृत्तात असावे लागते.रूबाई  बहुतांश ” बहरे  हजज “

मघ्ये असल्यामुळे हजज या वृत्तास ” बहरेरूबाई ” असे संबोधले

जाते. पण डॉ.ओमप्रकाश अग्रवाल उर्फ जार इल्लामी( हजरत सहर इश्किया बादी या प्रकांड पंडिताचे शिष्य ) या

छंदशास्त्रझाने रजज , रमल ,अमीक , मुंसरेह या मुसम्मन वृत्तात रूबाईचा आधारभूत शेर तक्तीअ

( छंदोगण विभाजन ) करून कसा बनतो , ते सिद्ध केलं आहे.

रूबाईचे वज्न  ला हवला व ला कुव्वता , इल्ला बिल्ल्ह ,

( मफऊल , मफाईल पफाईलुन फाई – गा गा ल , ल गा गा ल ,

ल गा गा गा , गा ल हे होय. यास बुनियादी वज्न  असे म्हणतात )

रूबाईच्या एकूण मात्रा या २४ वृत्तामध्ये कुठेही वीस ते

एकवीसपेक्षा जास्त नाहीत.रूबाईचे चारही चरण रदीफयुक्त

असू शकतात . खरेतर प्रथम रूबाईचे चारही चरण यमकयुक्त

असत. मग हळूहळू त्यातील तिसर्या चरणाचे यमक वगळण्यात

आले. अशा रूबाईला खसी रूबाई म्हणण्यात येऊ लागले.

विद्यमान रूबाई खसी रूबाईअ आहे. रूबाईमध्ये काहीवेळा

मूळ चरणात काही वाढ करण्यात येते . या रूबाईला मुस्तजाद 

रूबाई असे म्हणतात .रूबाई  खरेतर एका बुद्धीमान मुलाने

शोधून काढली असे म्हणतात व त्यावर उस्ताद रुदकीने

मान्यतेची मोहर लावली असे म्हणतात . त्यानंतर

अरबस्तानातील शायरांनीदेखील ह्या काव्यप्रकाराची स्तुती केली

व अरबी भाषेतही रूबाई निर्मिती होऊ लागली. रूदकीने

या काव्यप्रकारास “तराना “म्हणजे “सुरेल राग ” हे नाव दिले .

त्यानंतर दोबीती , रूबाई ही नावे रूढ झाली.अज्मच्या ह्या सुरेल

रागाची  कथादेखील  ऐकण्यासारखी आहे. असं म्हणतात

की एकश्रीमंत पुत्र डोंगराच्या उतारावर गोळ्यांऐवजी अखरोटांनी

खेळत होता. सहा अखरोट खेळतांना गोल खड्ड्यात जाऊन

पडले अन् सातवा अखरोट असं वाटत होतं  की चुकीच्या दिशेने

जाईल पण शेवटी तोही गोल खड्ड्यात जाऊन पडला. तो पोरगा

आनंदला अन् त्याच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे  खालील ओळी

बाहेर पडल्या —

” गलतां गलतां ही रूद तालिबे गो ! “

रूदकी हे योगायोगाने तेथून जात होते तोच ही ओळ त्यांच्या

कानावर पडली . ते एकदम आनंदले अन् त्या मुलाच्या या

एका ओळीवर त्यांनीदेखील उत्स्फूर्तपणे तीन ओळी आणखी

त्वरित रचल्या , अन् त्या रचनाकृतीला “तराना”

हे नाव त्यांनी दिले.अशाप्रकारे हा संक्षिप्त पण प्रभावी

काव्यप्रकार अज्मच्या बुद्धीमान व्यक्तीकडून प्रचलित

झाला एवढं मात्र खरं .

एक राग व जोषयुक्त गीतासही “तराना” म्हणतात.

एकबालए दोन तराने उर्दू साहित्यात विख्यात आहेत.

रूबाईच्या चोवीस अवजानचे दोन हिस्से आहेत.

पहिल्यास अखरब व दुसर्यास अखरम असे म्हणतात.

ही लगावली लगक्रम इ.

पाठ करण्यापेक्षा उर्दू शायरांच्या उत्तमोत्तम रूबाया

( देवनागरीत सहज उपलब्ध आहेत ) अर्थ जाणून शायरांनी

अभ्यासकांनी लयीसह वाचाव्यात . त्याने आपोआपच कालांतराने

रूबाई वृत्तांवर तुमची पकड मजबूत होईल व तुम्ही

कवी असाल तर रूबाईसृजनाची कला व शास्त्र तुम्हाला

अवगत होईल.

रूबाईच्या अंती येणारे गणरूप येथे स्पष्ट करतो .

१) अबतर फअ             –                   गा

२) अजल फाअ             –    U           गा ल

३) अहतम फऊल        U   –   U      ल गा ल

४) मजबूब फअल        –    U            गा ल

उर्दूतील प्रख्यात शायर व  छंदजाणकार कमाल अहमद सिद्दिकी

यांनी ” आहंग ओर उरूज ” या ग्रंथात रुदकीच्या

२४ अवजानांमथ्ये सहा रूबायालिहिल्या आहेत. म्हणजे

सहा रूबायंतील एकेक असे २४ चरण या चोवीस वृत्तात रचले

आहेत. उर्दूत रूबाईच्या संदर्भात ही सूट आहे.रूदकीच्या

चोवीस रूबाई-वृत्तंपैकी बारा वृत्त “म” गणाने

( म्हणजे मफऊलुन  – गा गा गा ) व बारा “त” गणाने

( म्हणजे मफऊल – गा गा ल ) सुरू होतात.

छंदवेत्ते हजरत अल्लाम सहर इश्कआबादी यांनी “मफऊल” चे

सहा रूबाईवृत्त व मफऊलुनचे सहा रूबाई वृत्त तयार केले.

हजरत अल्लाम यांचे शिष्य डॉ.जर इल्लामी यांनीदेखील

आपल्या गुरूच्या पावलाम्वर पाऊल ठेवून फाइलुन ( गा ल गा )

म्हणजे “र” गणाने सुरू होणारे अठरा रूबाईवृत्त तयर केले.

अता रूबाई वृत्तात यापेक्षा जास्त वृद्धी होण्याची मुळीच

शक्यता नाही असे डॉ.जार इल्लामी यांचे म्हणणे आहे.

एकूण ५४ रूबाई वृत्ते असलीतरी रुदकी यांचेच चोवीस वृत्त

अद्याप बहुप्रचलित व लोकांना माहित आहेत.त्यामुळे

त्यांचा वापर अलाम व डॉ. इल्लामी यांच्या रूबाई वृत्तंपेक्षा

जास्त आहे.रूबाईच्या विषयांबाबत काही बंधन नाही .

जुन्या शायरांनी इश्को=मुहबब्बत , शराब-शबाब याच

विषयांवर रूबाया लिहिल्या. विशेषकरून , तत्वचिंतन , नैतिकता

हे रूबाईचे विषय पण अकबर एलाहाबादीने

विडंबन काव्यासाठी हा फॉर्म वापरला. फिराक गोरखपुरीने

“रूप” या रूबाई संग्रहाद्वारे नवीन मानदंड  स्थापित केलेत

तर जॉनिसर अखरच्या रूबायात पती-पत्नीच्या  कौटुंबिक

जीवनाचे , प्रेमाचे स्वरूप अत्यंत

सुरेखपणे साकारले आहे. मीर तकी मीर , इकबाल , यास

यगाना चंगेजी , फानी बदायूनी , महरूम , अमजद

हैद्राबादी , अदम ही काही रूबाई शायरीतील मान्यवर

नावे आहेत. उमर खय्यामच्या (इ.स.१०४८-११२३) रूबाया फारसीच नव्हे तर विश्व साहित्यातील अमूल्य लेणी आहेत.

फिटस् जेराल्डच्या एंग्रजी (इ.स.१८५९) अनुवादाच्या

लाखोप्रती आजवर प्रकाशित झाल्यात . मराठीत ज.के. उपाध्ये

या कवीने खय्यामला मराठीत आणले तसेच माधव

जूलियन यांचा अनुवादही विख्यात आहे. या रूबाया

जागतिक भाषात गेल्यावर एवढ्या लोकप्रिय

झाल्या की अनेक देशात

उमर खय्याम क्लब स्थापन झाले.

( लेखक ः श्री . राम पंडित – आकंठ दिवाळीअंक २००२ मधून )

प्रतिक्रिया टाका