रान देऊळ देऊळ . .

रान देऊळ देऊळ
जित्या खांबांवरी उभे
डोंगराच्या मंदिलात
हिर्व्या तुर्‍यावाणी शोभे . .

 

ढेकळाच्या मुठींमधे
बुक्का गुलाल मावेना
नाचे वारकरी वारा
भुई आकाश पुरेना . .

 

वेळूबनात सनई
उधळीते नादरंग
घरट्यांत चोचीवर
किलबिलती अभंग . .

 

— मेघ होऊन सांडतो
विठू सावळा सावळा
सार्‍या जगाचा संपतो
त्याच्या प्रसादे उन्हाळा !

 

—————————————
कवी : वा. न. सरदेसाई

प्रतिक्रिया टाका