रानवठा . .

मुकेपणालाही
इथे अर्थ असतो
रानवठ्यात !

 

इथे , पक्ष्यांनी बोलायचंय्
वार्‍यानं गुणगुणायचंय्
उन्हानं हसायचंय्
पाऊसधारांनी नाचायचंय् . .

 

आकाशानं विचारायचंय्
आणि
मातीनं सांगायचंय् !
. . अबोल होऊन
आपण मात्र
कानांत प्राण आणून ऐकायचंय् . .

 

डोळे भरून पहायचंय्
आणि
अंगभर सळसळणारं
एक रान
मनोमन अनुभवायचंय् . .

 

. . मुकेपणालाही इथे अर्थ असतो
रानवठ्यात !

—————————————
कवी : वा. न. सरदेसाई

प्रतिक्रिया टाका