रानपक्षी

मला तो गाणारा रानपक्षी
कोणी आणून देता का ?

त्याच्या गळ्यात
मला
कोंडून घ्यायचय् . .
त्याच्या जिवंत सुरात
मला
समाधी घ्यायचीय !
– तो शब्दांशिवाय गाणं म्हणतोय ! !

शब्द . .
शब्द आता सर्वदूर
फसवे नि धूर्त !

आमचे उदंड शब्द
आम्हाला जड झालेत . . .
ओलावा नाही
अर्थ नाही
आनंद नाही . .ऍट नाही . .

त्याच्या तानेत हे सर्व आहे .
त्याच्या मानेत
विश्वाचा गर्व आहे !
मला . .
मला तो गाणारा पक्षी
कोणी आणून देता का ?

 

 

प्रतिक्रिया टाका