रानदिवे . .
एक अजस्त्र काळं पान
आकाशातून
गळून पडावं ,
तसा सार्या रानावर
सांजकाळोख दाटतो . .
. . रातकिड्यांच्या
किर्रर्र आवाजानं
रानसुद्धा
कधीकधी
भीतीनं थरथरतं . .आणि . .
. . त्याला
सोबत करता करता
काजवेच
असंख्य रानदिवे
होऊन जातात !
—————————————
कवी : वा. न. सरदेसाई
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा