रानझरा . .
एक रानझरा
एकटाच वाहणारा . .
थोडा सरळ
थोडा वाकडा . .
. . कुठे वळसा घालून
कातळखंडाला
वाट चुकल्यासारखा
. . कुठे ओलसर
सडा टाकल्यासारखा !
कुठे तुटल्यासारखा
कुठे नटाल्यासारखा . .
. . गवतचार्यांचे सलाम घेत
रानफुलांचे
निरोप घेत
तो पुढंच वाहत असतो . .
. . पहाटेचं
आकाशही
मग , एवल्या रंगीत होड्या घेऊन
अनंताची सफर करतं !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा