रंग . .

सप्तरंगातील माझा
कोणताही रंग आहे
जे दिसे त्याहून न्यारे
आणखीही अंग आहे . .

 

वॄक्ष झालो की, पुराणी
वल्कलेही नेसणे
नागडा पाषाण होणे
अन् कशाला लाजणे
– – सभ्यतेने वागण्याचा
– – और माझा ढंग आहे . .

 

एवढासा थेंब मी, पण
ओघ होउन वाहतो
शब्द मी असुनी अभंगच
मुक्त गाऊ लागतो
– –  मी अनेकांतून माझा
– – एकटयाशी दंग आहे . .

 

रात्रिच्या गर्भात माझा
वंश सूर्याचा हवा
फक्त गोर्‍या पौर्णिमेची
का करू मी वाहवा
– –  अवस काळी असुन तिजशी
– –  नित्य माझा संग आहे . .

 

 

प्रतिक्रिया टाका