रंगांची जादू
निळ्याशार आभाळात
पिवळं ऊन्ह घाला
हिर्वागारा मळा बघा
भेटायला आला . . !
निळ्या नदीत बुडवा
ढग तांबडे-लाल
पिक्की जांभळं बघून
नाचायला लागाल . . !
लालबुंद सूर्याला
चमचा दूध पाजा
गुलाबाच्या गालिच्यावर
सगळ्यांनी निजा . . !
सोप्पी माझी जादू
लहान मुलांसाठी
फक्त एक व्रश हवा
आणि रंगपेटी . . !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा