येथे कोणीही कोणाचे नाही . .
वृत्त : मयूरी
गण : गागागा गागागा गागागा गा ( गण : म , म , म, ग )
येथे कोणीही कोणाचे नाही . .
ओठाशी हे आणायाचे नाही !
आयुष्याचे तू मी दोघे साथी
मागे कोणी थांबायाचे नाही .
जन्मा घाली चोचीसंगे दाणा ,
त्या दात्याशी मागायाचे नाही !
जे नाही ते आहे सर्वांसाठी
जे आहे ते एखाद्याचे नाही .
दु:खी झालो रक्ताच्या नात्याने
डोळा डोळा पाणी ह्या घावाचे नाही !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा