‘ यंदाची दिवाळी तुम्ही गाजवली ‘ . . .श्री सुरेश भट

‘ यंदाची दिवाळी तुम्ही गाजवली ‘ – श्री सुरेश भट

दिनांक १९.११.१९८७ रोजी वा न सरदेसाईंना लिहिलेल्या पत्रात श्री. सुरेश भट म्हणतात ‘ यंदाची दिवाळी तुम्ही गाजवली ‘ .

वा न सरदेसाईंच्या गझल लेखनाचा आरंभ ते ह्या पत्रातील वरील वाक्यापर्यंतचा त्यांच्या गझल लेखनाचा प्रवास हा फक्त दोन वर्षांचा . वा न सरदेसाईंनी गझल लेखन सुरु केल्यापासून केवळ दोनच वर्षांत श्री सुरेश भट सरदेसाईंना पत्र पाठवून ‘ यंदाची दिवाळी तुम्ही गाजवली ‘ असे लिहितात . विशेष आहे ना ?

वा न सरदेसाईंनी मारलेली गझलक्षेत्रातील मजल केवळ श्री सुरेश भटांच्या लक्षात आली का ? त्या अगोदर अन्य कुणाच्याही नाही का ? नाही तसे नाही . तीच मजा आहे आणि विषयसुद्धा आहे आजच्या माझ्या व्यक्त होण्याचा .

मित्रांनो , वडिलांना श्री सुरेश भटांनी पहिले पत्र १८.०९.१९८५ रोजी पाठविले . त्यातील फक्त काही वाक्यंचा उल्लेख करतो आणि माझे पुढील खरी स्थिती लिहितो . श्री सुरेश भट त्या पत्रात लिहितात :
१) तुमची गझल निर्दोष आहे . ( पहिलीच गझल बरं )
२) मराठी गझलेला तुमच्या सारख्यांची गरज आहे .मराठी कवितेत गझल या काव्यप्रकाराची शास्वत शक्तिशाली भर पडली पाहिजे . या कामाला आता तुमचा सतत हातभार लागावी.
३) तुमच्या गझलेमुळे माझ्या मनात तुमच्याविषयी फार मोठ्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत .
४) माझा अपेक्षाभंग करु नका.
५) तुम्ही अगदी निर्दोष वृत्तात लिहिता .सहसा असे आढळून येत नाही .

आता खरी मजा आहे . त्याची नोंद वाचकांनी ठेवावी असे वाटते म्हणून लिहितोय .

वरील पहिले पत्र सप्टेंबर १९८५ चे . म्हणजे १९८५ दिवाळीच्या अगदी अगोदरचे .
मित्रांनो , १९८५ साली प्रकाशित झालेल्या सुमारे ३०० दिवाळी अंकांचे वाचन करून पुढील वर्षी म्हणजे १९८६ साली ‘ अक्षर दिवाळी ८६ ‘ ह्या नावाचा स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला होता . ह्या दिवाळी अंकात फक्त १३ कवितांची निवड करण्यात आली होती . ह्या कवितांत श्री वा न सरदेसाईंच्या गझलेचा समावेश होता .

१५ मे १९८८ च्या महाराष्ट्र टाईम्स ह्या वर्तमानपत्रातील आपल्या लेखात श्री राम मंत्री जे लिहितात ते पुढे अवतरण चिन्हात देतोय . . .

” प्रत्येक वर्षी शेकडो दिवाळी अंक निघतात . त्यातील बरेच
वाड्:मय सुमार दर्जाचे असते तर काही उत्तम दर्जाचे असते . साहित्यिक गुणवत्ता आणि टिकाउप्णा अस टिकाउपणा असणारे असे ‘ यंदाची दिवाळी तुम्ही गाजवली ‘ एकत्र करून ‘ अक्षर दिवाळी ८६ ‘ या अंकाची सिद्धता कराई अशी भूमिका घेउन प्र. ना. परांजपे , कमल देसाई प्रभुतींनी या अंकाची सिद्धता केली आहे . या अंकाचे पाचही संपादक साहित्याहे जाणकार , चिकित्सक व अभ्यासू आहेत .
तीनशेपेक्षा जास्त अंकांचे वाचन करून त्यातून ही निवड करणे किती कष्टाचे व जिकरीचे आहे याची सहज कल्पना येते .
दिवाळी अंकांतून अनेक वाड्:मयप्रकार हाताळले जातात .
या अंकातील तरा कवितांत कुसुमाग्रज , शांता शेळके यांच्यासारख्या कवींबरोबरच डहाके , लिंबाळे या नव्या कवींच्या कविता आहेत .ही निवड सार्थ अशीच आहे . सरिता पदकी यांची ‘ द्विक ‘ आणि
गझलाची रचना असूनही सामाजिक जीवनातील विसंगतीची तीव्र जाणीव अलिप्त वृत्तीने व्यक्त करणारी वा न सरदेसाई यांची ‘ काय करता ! ‘ ही कविता विशेष स्मरणात राहील . “

वर लिहिल्याप्रमाणे ह्या अंकाच्या पाच संपादकांनीही श्री वा न सरदेसाईंच्या गझलेचा सत्कार अगोदरच म्हणजे १९८५ मधेच केला होता आणि त्यानंतर १९८७ मधे श्री सुरेश भटंनी .

हे आपणांस माहित होते ? आवडल्यास कळवा .

आपला

प्रमोद सरदेसाई

जाता जाता . .

१) तीनशे दिवाळी अंकातील १३ कवितांतील वा न सरदेसाईंची गझल कोणती होती हे पहाण्यासाठी :

 

२) श्री सुरेश भट आणि श्री वा न सरदेसाई ह्यांचे मी पाहिलेले / समजलेले संबंध

३) श्री सुरेश भटांच्या कार्यक्रमात त्यांच्या आग्रहास्तव सादर केलेली गझल :

प्रतिक्रिया टाका