मोह . .

वेदनांचे वेड
स्वयंभू मनाला
मेघाच्या जन्माला
जावे वाटे . .

 

खाली जलाशय
वर तारांगण
कुशीत झोपणं
आकाशाच्या . .

 

सोसावे चटके
घेत वीजझुंज
न्याहरीला रोज
खारा वारा . .

 

जगाच्या कारणी
पडावा हा देह
जीवनाचा मोह
याच्यासाठी !

 

 

प्रतिक्रिया टाका