मोठ्ठी माणसं
मोठ्ठी माणसं मला
बाहुलीसारखं धरतात
नकोनको म्हटलं
तरी पापे घेतात !
कोणी म्हणतं गुलामा
कोणी म्हणतं लुच्चा
उगीचच घेतात
माझा गालगुच्चा !
म्हणून मी किनई
त्यांच्यावर रुसतो
गालांवरचे पापे
त्यांच्या देखत पुसतो . . !
– मोठ्ठी माणसं नुसती
तोंड बघत बसतात
कुण्णाकडे कशी
चौकलेटं नसतात ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा