मैफील . .

समोर जाळी – झुडपं
बसकण मारून
बसलेली . .
ओणवी – उभी झाडं
अंगाखांद्यांवर रेललेली
गुंतताना कललेली . .

 

झरा चार्‍यावर लवंडलेला
चंद्र
फांदीवर लहडलेला . .

 

अशी ही माझी
एक रानमैफील अनोखी
रंगणारी माझी गाणी
रानफुलांसारखी !

 

————————————————–
कवी : वा. न. सरदेसाई
————————————————-

प्रतिक्रिया टाका