मुक्त कसे गीत नवे ये अधरी ?

अक्षरगणवृत्त : मानवती
गण : गाललगा गाललगा गाललगा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८५

 

 

मुक्त कसे गीत नवे ये अधरी ?
पायरवाचीच तुझिया जादुगिरी !

 

सुंदर चंद्रास ढगांचा विळखा
का छळते याद तुझी ह्या प्रहरी ?

 

मी न बघे दूर वरातीस तुझ्या . .
ऐकत आहे सनई दर्दभरी !

 

वाट अशी की न कुठे वाटसरू . .
वृक्ष न , पक्षी पण अद्याप तरी !

 

ह्या दुनियेनेच मला संपविले
मीच जिला श्वास दिले आजवरी !

 

प्रतिक्रिया टाका