मी सदाकदा खोटे बोलतो असे नाही . .
सूट घेतलेले अक्षरगणवृत्त :रंगराग
लक्षणे : गालगाल गागागा ! गालगाल गागागा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८६
मी सदाकदा खोटे बोलतो असे नाही . .
अन् खरे कधीही मी टाळतो असे नाही !
ऐक , घर मनामधले बांधणे नव्हे सोपे . .
पुस्तकातले हे मी सांगतो असे नाही .
वरवरून शब्दांची लावुनी खता – मलमे ,
घाव काळजावरचा सांधतो असे नाही .
काळजीतला माझा चेहरा असे न्यारा . .
मी दिसूनही हसरा , मीच तो असे नाही !
माझिया गुहेचा घ्या , जंगलातला पत्ता !
माणसांत मी हल्ली राहतो असे नाही ! !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा