मी श्वास श्वास माझे . .

मात्रावृत्त : रसना
लक्षणे : [ गा l गालगाल l गा + , गा l गालगाल l गा + ]
+ म्हणजे निश्चित गुरू .

 

मी श्वास श्वास माझे अंगारवीत गेलो
झालो मशाल मीही , ती चेतवीत गेलो !

 

माथ्यावरी तुरे मी खोवून विस्तवाचे
आगीत पाय माझे , मी नाचवीत गेलो .

 

उघडून ज्वाळपंखी देहावरी पिसारा ,
ठिणग्यांत कोंडलेल्या केका ब्रवीत गेलो !

 

उमद्या मिठीत अवघे , आकाश ओढताना ,
स्पर्शांतुनी विजांना , मी जागवीत गेलो !

 

आनंद – आसवांचे वणवे निवांत गिळले . .
रानात गर्भ हिरवा , मी भारवीत गेलो !

 

.

प्रतिक्रिया टाका