मी तुला माळण्या फूल न्यावे . .
वृत्त : भामिनी
गण : गालगा गालगा गालगा गा
मी तुला माळण्या फूल न्यावे . .
माळता मीच ते फूल व्हावे
ऐकवावे नवे शब्द माझे
अन् तुझ्या गीत ओठांत यावे .
वेल भासे मला वाळलेली . .
मी कवेने पुन्हा माप घ्यावे !
हे कसे काय रात्रीस सांगू ?
की, तिने घेत जावे विसावे .
डोळियांचे निळेशार पाणी
मी तळ्यांच्या तळाशी बुडावे .
वाटते की, तुझे स्पर्श गोरे
मोरपंखात ठेवून द्यावे !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा