मी तशी माघार घेणे

मात्रावृत्त : मध्यरजनी
लक्षणे :गालगागा गालगागा गालगागा गालगा+
( + म्हणजे निश्चित गुरू )

 

 

मी तशी माघार घेणे , हीच त्यांची हार होती . .
मी मुक्याने सोसली ती आजची ललकार होती !

 

 

मी तिला बघताक्षणी ती वाटली माझीच आई . .
लक्ष असणारी पिलांवर , एक उडती घार होती

 

 

माझिया स्वप्नांवरीही का तुझाडोळा असावा ?
आसर्‍याला राहुनीही ती मला आधार होती !

 

 

सांगतो , का तोडले मी आपल्याही माणसांना . .
: स्वाभिमानासह स्वतःला ती उद्या विकणार होती !

 

 

त्यांस म्यानातूनही जी काढणे जमलेचे नाही ,
पूर्वजांची एक विजयी ती जुनी तलवार होती !

 

 

लाजुनी का वाजण्याची थांबली ती यंत्रवाद्ये ?
एकतारीला तुझ्या त्या आतड्याची तार होती !

 

 

औषधालाही नसावे दु:ख माझ्याशी अखेरी . .
हीच एकांती मनाची लाघवी तक्रार होती !

 

 

धूर्त  मृत्यूचे जरी ते प्रश्नही होते करारी . .
मी दिली जी उत्तरे ती जास्त बाणेदार होती !

.

 

.

प्रतिक्रिया टाका