मी जुनी टाकून आलो
मी जुनी टाकून आलो कात माझी
जीवनाची ही नवी सुरवात माझी !
लोक अपुली काळजी जपती सुखाने . .
मज हसु फुटता मजा बघतात माझी
चांदण्याने भाजतो का हात माझा ?
भर दुपारी वाट चुकली रात माझी !
प्रेम मी केले इशार्यावर कुणाच्या
अन् कुणापुढती सुरू रुजवात माझी .
सांत्वने अजुनी तुझी मिळता , समजले . .
जखम ‘ ती ‘ झाली किती विख्यात माझी .
चित्र की चौकट अधिक सुंदर , कळेना
मेहुणी होती उभी दारात माझी !
हातवार्र्यार नको जाऊस त्यांच्या
ती फुले असतील कवने गात माझी !
जाहले जेव्हा दिसेनासे दिशाना . .
भिजविली रक्तामधे फुलवात माझी !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा