मी एक झाड . .

मी
जसजसा
रानापाशी जातो ,
तसतसं
सारं रानच
भिनत जातं माझ्यात !

शरीरमाती
आतल्या आत कुठेतरी
कालवली जाते . .
रोमांकुरत
आभाळमिठीत
ओढली जाते
आणि

. . जड होऊन
स्थिरावलेल्या पायांना
मुळं फुटल्यागत
मी तिथे
एक झाड होऊन
हिरवीगार स्वप्नं
पालवीत बसतो .

————————————————–
कवी : वा. न. सरदेसाई
————————————————-

प्रतिक्रिया टाका