मातीचं गाणं . .
राना,
तू मला
फुलांचे शव्द दिलेस :
रंगाच्या छटा दिल्यास :
.
फळांचे अर्थ दिलेस . .
हिर्वी हिर्वी
कविता दिलीस !
.
– मी
तुला काय द्यावं ?
. . माझ
चिमूटभर
मातीचं गाणं
तुझ्याच पोटी
जन्माला यावं !
राना,
तू मला
फुलांचे शव्द दिलेस :
रंगाच्या छटा दिल्यास :
.
फळांचे अर्थ दिलेस . .
हिर्वी हिर्वी
कविता दिलीस !
.
– मी
तुला काय द्यावं ?
. . माझ
चिमूटभर
मातीचं गाणं
तुझ्याच पोटी
जन्माला यावं !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा