माझ्या जिव्हारी तो वार होता . .
सूटघेतलेले अक्षरगणवृत्त : स्वानंदसम्राट
लक्षणे : गागाल गागा ! गागाल गागा
माझ्या जिव्हारी तो वार होता . .
त्याला हवा तो आधार होता !
तक्रार चोरांची ज्यास केली ,
तो तस्करांचा सरदार होता .
त्यांचा बिळातच सत्कार झाला
इतका कसा तो लाचार होता ?
रस्त्यात पायी चालूनसुद्धा ,
जो तो हवेच्यावर स्वार होता !
आतंकवादी निसटून गेले . .
सूर्यास तेव्हा अंधार होता !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा