माझिया मनामधुनी . . .
वृत्त : पाणिबंध
गण [ l गालगाल l गाललगा ! गालगाल l गाललगा ] छंदो.पान क्र. १८६
माझिया मनामधुनी तू मुळी हलूच नये . .
सांग, मी तुझे अपुरे चित्र रंगवूच नये ?
कोण अप्सरा दिसली आरशास त्या दिवशी ?
शब्द एकही अजुनी ह्यास का फुटूच नये ?
मान ज्या घरात नसे , थांबता कशास तिथे ?
पायरी अशी उतरा जी पुन्हा चढूच नये !
हा अनोळखी नसला गाव एरव्ही मजला ,
पावलांस आज जुनी वाट का पटूच नये ?
एक तारका तुटुनी ये जशी धरेवरती ,
वाटले , दिवा घरचा कोणत्या विझूच नये !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा