माझा संसारी भगवान

विश्वाचा हा दिव्य पसारा
त्यास जीव की प्राण
माझा संसारी भगवान .  .

 

सप्तरंग घेऊन रेखिली
तीट फुलांच्या कोमल गाली
द्रुष्ट न लागो सुंदरतेला
ठेवियले अवधान . .

 

कवच घालुनी सर्वांगाला
बीजकोय आली जन्माला
उपजत तो सांभाळी अपुले
आवडते संतान . .

 

सजिवांसाठी रानोरानी
अन्न रांधले हिरव्या पानी
अमॄतवाटी टांगुनि केली
वॄक्षवेल निर्माण . .

 

 

प्रतिक्रिया टाका