महापूर येऊन गेला . .

अक्षरगणवृत्त : प्रमीला
गण : लगागा लगागा लगागा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८८

 

महापूर येऊन गेला . .
लव्हाळा म्हणे वाचलेला !

 

किती देखणी रात होती . .
पुरा चंद्र होता कवेला !

 

कुठे आश्रमालाच ठावे ?
गुरू कोण अन् कोण चेला .

 

तुला पाहुनी वाटले की . .
उदेला रवी पश्र्चिमेला !

 

अशी धुंद मैफील ओली . .
फुटे एक पेल्यास पेला !

 

कसा मोकळा होत गेलो ?
कुठे ना कुठे गुंतलेला ?

प्रतिक्रिया टाका