मला हवंय् एक रान
मला हवंय् एक रान
माझं असं एक रान . . !
एक मस्ताना पक्षी होणं
दाणे बिया फळं खाणं
रुजवीत जाणं
आपलीच घाण . .
– मला हवंय् एक रान !
फुलपाखरू भिरभिरतं
परागकण वाहून नेतं
फुलाफुलांत
गर्भाधान . .
– मला हवंय् एक रान !
वारा पाऊस उन्ह माती
आकाशाशी रक्तनाती
रक्तथेंब हिर्वं पान . .
– मला हवंय् एक रान !
माझं असं एक रान ! !
—————————————
कवी : वा. न. सरदेसाई
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा