मला सायकल येते . .
आता मला सायकल
चालवायला येते
वाट्टेल तिथनं
वळवायला येते –
तुलासुद्धा बघ ,
घेईन डबलसीट
मी सांगेन तस्सं
बसायचं नीट –
कधीमधी धुप्पकन्
पडायला होतं
लागलं तरी लगेच
रडायचं नसतं –
” त्यात काय मोट्टंसं ”
असं नुसतं म्हणायचं
हळूहळू उठलास की ,
बंद होतं कण्हायचं –
– आईला ह्यातलं काही
सांगायचं नाही
घर जवळ आलं की,
लंगडायचं नाही !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा