. . . मराठीत रुबाई सर्वप्रथम श्री वा न सरदेसाई ह्यांनीच रचली . .

हे म्हणणं आहे डॉ .श्री राम पंडित ( पी एच डी उर्दू- हिंदी ) ह्यांचे .

एप्रिल २०१७ साली प्रकाशित झालेल्या श्री वा न सरदेसाईंच्या माझ्या शेरोशायरीतील काही शब्दशिल्पं ह्या ललितबंध संग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ. श्री राम पंडित ह्यांनी काय म्हटलंय ते पहा :

 वा न सरदेसाईंची गेय वृत्त – छंदांवर जेवढी पकड आहे तेवढीच अगेय म्हणजे अप्रचलित कष्टसाध्य वृत्त – छंदांवरदेखील आहे. या दोन्हींतही ते लीलया आशयगर्भ शेर रचू शकतात . . .

. . . उदाहरण द्यायचं झाल्यास उर्दूतील रुदकी , इष्कअबादी आणि जार एल्लामी यांचे एकूण पन्नासहून अधिक असलेले रुबाई – छंद  ; यांतील समग्र छंदांत त्यांनी रुबाया मराठीत सर्वप्रथम लिहिल्या आहेत . त्यानंतर काहींनी अवश्य लिहिल्या पण प्रथमपणाचं श्रेय वा सरदेसाईंचंच आहे !

२००३ साली प्रकाशित झालेल्या वा न सरदेसाई ह्यांच्या ‘चांदण्याची तोरणे ‘ह्या काव्य संग्रहात ६९ वृत्तांतील १२० गझला आणि सर्व मान्यताप्राप्त वृत्तांतील ५४ रुबाया ह्यांचा समावेश होता.  रुबाईसाठी हवी असणारी वृत्ते आणि अन्य माहिती वा न सरदेसाईंना ‘ आकंठ ‘ २००२ च्या गझल विशेषांकातील डॉ.  श्री राम पंडितसरांच्या लेखात मिळाली .

वरील ‘ चांदण्याची तोरणे ‘ ह्या संग्रहाच्या प्रस्तावनेत श्री.राम पंडितसर म्हणतात , ” श्री सरदेसाई यांनी अल्पावधीत समग्रवृत्तांत ओघवत्या भाषाशैलीतल्या टवटवीत अशा रुबाया रचल्या आहेत. एकाचवेळी समग्र रुबाईवृत्तांत वेगवेगळ्या चौपन्न रुबाया रचलेल्या उर्दूतील काव्यसंग्रहातदेखील आढळत नाहीत . बर्‍याचशा रुबाया उर्दूतील रुदकीच्या चोवीस वृत्तांतच दिसून येतात. म्हणून सरदेसाईंच्या या रुबायांचे महत्त्व मराठी शायरीत उल्लेखनीय ठरेल.”

त्यानंतर २००९ साली आलेल्या श्री वा न सरदेसाई ह्यांच्या ” अंगाई ते गझल – रुबाई – समग्र वा न सरदेसाई ” ह्या काव्यसंग्रहात काव्याच अनेक प्रकार अंतर्भूत आहेत . जसे – अंगाई , भावगीते , अध्यात्मगीते , कोळीगीते ( लोकगीते ) , देशभक्तिपर – गीते , गण – गवळण , लावणी – पोवाडा , ओवी – अभंग , भक्तिगीते , मुक्तछंद , हायकू , दोहे , बालकविता , ‘ रानरंग ‘ ( स्वतंत्र कविता संग्रह ) आणि  ९० वृत्तांतील १४३ गझला आणि ह्याच संग्रहात एकूण १२६ रुबाया सुद्धा आहेत .

२००२ सालच्या चांदण्याची तोरणे ह्या संग्रहात सर्व मान्यताप्राप्त वृत्तातील ५४ रुबाया होत्या आणि २००९ सालच्या संग्रहात एकूण १२६ रुबाया आहेत .नवीन टवटवीत सर्व रुबाया  ह्या केवळ अक्षरगणवृत्तांतील ( एका गुरू वर्णासाठी दोन लघूवर्ण ही सूट न घेता ) आहेत हे विशेष .

त्यानंतर श्री वा सरदेसाईंच्या २००९ साली प्रकाशित झालेल्या ” अंगाई ते गझल रुबाई – समग्र वा न सरदेसाई ” ह्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ .श्री राम पंडित रुबाईबद्द्ल लिहितात :

रुबाईत पहिल्याओळीत एक वक्तव्य / विधान . नंतरच्या दोन ओळींत त्याच्या समर्थनार्थ तर्कनिष्ठ वा मनोज्ञ विवरण ( विस्तार ) . चवथ्या चरणात मंत्रमुग्ध करणारा आकर्षक समारोप असतो . सर्वसाधारण याच निकषावर रुबाई तपासली जाते .

 ह्या २००९ सालच्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ .श्री राम पंडित वा न सरदेसाईंच्या रुबायांबाबत काय लिहितात हे पहा .

) वा न सरदेसाईंनी तीनही छंदवेत्त्यांच्या ( श्री. रुदकी, श्री. सहर इश्क आबादी आणि डॉ. श्री. जार इल्लाम ) रुबाई वृत्तांचा अभ्यास करून एकूण १२६रुबाया रचल्या आहेत .

) खरे पाहिले तर वरील वृत्तांपैकी जवळपास चाळीस पंचेचाळीस रुबाई वृत्ते थोडीकठीण आहेत . रुदकी किंवा हजरत इल्लाम इश्क आबादी यांची जवळपास सगळीच वृत्ते हिंदी – मराठीतच नव्हेत तर उर्दूतदेखील क्लिष्ट वाटावी अशीच आहेत .म्हणजे मराठीत रचनेसाठी हवी असलेली गेयता , लय त्यात फारशी नाहीच , असे म्हणण्यास वाव आहे. पण सरदेसाईंची शब्दांवर असामान्य हुकमत आहे. छंद कितीही अवघड असो , तो त्यांना सहज वश होतोअसा माझा अनुभव आहे .

) उर्दूत जरी गुरुवर्णाऐवजी दोन लघू वर्ण योजिण्याची सूट असली तरी बहुतांश ठिकाणी सरदेसाईंनी ती सूट न घेता छंदांचा वापर केला आहे .

( ह्याच मुद्द्याला धरून श्री. वा न सरदेसाईंचे ” अक्षरगणात मराठी रुबाई ” बद्दल स्पष्टीकरण वाचायला रसिकांना नक्कीच आवडेल म्हणून ही लिंक देतोय . )

) उर्दूतील शंभर शायरांपैकी फक्त दोन शायर रुबाया रचताता असं म्हटलं जातं . त्यादेखील संख्येच्या दृष्टीने तुरळकच  असतात पण गेल्या दोन दशकांत तरी माझ्या वाचनात उर्दू शायरांचा नवा रुबाईसंग्रह आला नाही . या पार्श्वभूमीवर मराठीत वान सरदेसाईंचे विपुल प्रमाणात रुबाई सृजन अत्यंत लक्षणीय मला नक्की वाटते .

) सरदेसाईंच्या रुबाईचे स्वरूप अस्सल मराठीच आहे . त्यात उर्दूचे अनुकरण कुठेच आढळत नाही .

) एकाच वेळी विविध वृत्तांत वेगवेगळ्या एकशे- सव्वीस रुबाया रचलेल्या उर्दूतील काव्यसंग्रहातदेखील आढळत नाहीत . बर्‍याचशा रुबाया उर्दूत रुदकीच्या चोवीस वृत्तांतच दिसून येतात . म्हणून सरदेसाईंच्या या रुबायांचे महत्त्व मराठी शायरीत उल्लेखनीय ठरेल .

) उर्दूतील प्रख्यात  शायर व छंदज्ञाता कमाल अहमद सिद्दीकी यांनी ‘ आहंग और उरुज ‘ या ग्रंथात रुदकीच्या चोवीस अवजानांमध्ये सहा रुबाया लिहिल्या आहेत . म्हणजे सहा रुबायांतील एकेक असे चोवीस चरण या  चोवीस वृत्तांत रचले आहेत . उर्दूत रुबाईच्या संदर्भात ही सूट आहे. याच धर्तीवर वा न सरदेस्सईंनी रुदकीच्या चोवीस अवजानांमध्ये दोन वेळा अशा एकूण बारा रुबाया रचल्या असून प्रत्येक चरणासाठी त्यांनी स्वतंत्र रुबाई अवजान ( वृत्त ) निवडून त्यांचे क्रमांकही दिले आहेत. वा न सरदेसाईंच्या रुबायांचे हेही एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल .

) मुस्तजाद गझलप्रमाणे मुस्तजाद रुबाईदेखील असते . ज्या रुबाईचे चारही चरण रदीफ काफियायुक्त  असतात तिला शुद्ध रुबाई म्हणतात . ज्या रुबाईत तिसर्‍या चरणात  रदीफ काफिया नसतो ती ‘ खस्सी रुबाई ‘ संबोधली जाते . हीच रुबाई सर्वाधिक प्रचलनात आहे. वा न सरदेसाईंनी तिन्ही प्रकारच्या रुबाया लिहिल्या आहेत .

डॉ .श्री राम पंडितसर २००९साली झालेल्या वा न सरदेसाईंच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसमारंभी आपल्या  भाषणात म्हणतात रुबाई हा अत्यंत क्लिष्ट काव्यप्रकार वा. न. सरदेसाईंनी सहजपणे हाताळला आहे . वा. न. सरदेसाईंनी जे विषय इतक्या सहजपणे रुबाईमधे मराठीत प्रथमतः मांडले आहेत त्याचा समग्र समीक्षकांनी वेगळा विचार करायला पाहिजे कारण तो छंदशास्त्रीय विचारच नव्हे तर रुबाईच्या अनुषंगाने त्यातला जो  सूत्रबद्ध विचार आहे त्याचा एक अलग विचार व्हायला हवा. https://youtu.be/BtkozJcfaJU

( चांदण्याची तोरणे , अंगाई ते गझल रुबाईसमग्र वा. . सरदेसाई आणि माझ्या शेरोशायरीतील काही शब्दशिल्पं ह्या वा न सरदेसाईंच्या तीन पुस्तकांतील डॉ.श्री राम पंडित ह्यांच्या प्रस्तावनेतून . .. . )

मित्रांनो , वा न सरदेसाईंनी रुबाई लिहून जवळपास २० वर्षे व्हायला आली . आज प्रथमच ही बातमी आपल्यासमोर ठेवीत आहे .

वा न सरदेसाईंच्या गझला , रुबाया , दोहे ,कविता ह्यासाठी यूट्यूब चॅनल

https://www.youtube.com/c/PramodSardesai

आपला

प्रमोद सरदेसाई

मोबा. ९८९२५०२४९६

प्रतिक्रिया टाका