भोपळा . .
इतिहास म्हणजे
डोकेदुखी . .
लढाईवर गेले
तेवढेच सुखी . . !
विज्ञान म्हणजे
नसता त्रास . .
शंका विचारील
तोच पास !
भूमिती म्हणजे
हाल कोण . .
भाल्यासारखे
कोन त्रिकोण !
गणित म्हणजे
पंचाईत . .
सगळी उत्तरं
देवाला माहीत !
भूगोल म्हणजे
पुरेवाट . .
आख्खं जग
करा पाठ !
इंग्रजी मणजे
पोटात गोळा . .
सरांचा फक्त
स्पेलिंगवर डोळा !
चित्रकला म्हणजे
काम फत्ते . .
एका भोपळ्यात
म्हणाल ते !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा