भिजती गात गात आठवणी . .
अक्षरगणवृत्त : वनमाला
गण : ललगागा लगालगा ललगा
छंदोरचना पृष्ठ क्र.१८५
भिजती गात गात आठवणी . .
अजुनी पावसात आठवणी !
जग माझे – तुझे अगोदरचे . .
फिरुनी दावतात आठवणी !
विरही आसवांत ‘ वात ‘ तसे . .
मन का जाळतात आठवणी ?
बघुनी एकटा निवांत मला ,
जमती अंतरात आठवणी !
वय होताच का जुन्या शपथा . .
विसरू लागतात आठवणी ?
—————————————–
लेखनकाल ०६.११.२००४
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा