बोल काहीतरी . .
वृत्त : भुवनसुंदर
गण : उ प म्हणजे १४ किंवा १५ मात्रा. ( उ = ४ किंवा ५ मात्रा . प = ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू )
बोल काहीतरी कळू दे . .
एकदा वीज कोसळू दे !
ठेव , प्रीतीस चंद्र साक्षी
थांब , सूर्यास मावळू दे .
सावराया कशास घाई ?
तोल माझा पुरा ढळू दे !
नाटकी का रडू असेना,
ओल अश्रूंत आढळू दे .
मी अता लागलो विझाया . .
राहिलो तेवढा जळू दे .
नाव सांगून अमृताचे
जहर हेही हळूहळू दे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा