बीजामधले हिरवेपण मी जपेन म्हणतो . .
मात्रावृत्त : अनलज्वाला
लगावली : एकूण २४ मात्रा . ( ८ +८ +८ )
बीजामधले हिरवेपण मी जपेन म्हणतो . .
आज – उद्या ह्या खडकावरही रुजेन म्हणतो !
हारजितीच्या काट्यावरती भविष्या ज्याचे ,
त्याच्या विजयासाठी शर्यत हरेन म्हणतो .
मी दुसर्यांचे डोळे लावुनि कशास पाहू ?
जग हे उघड्या डोळ्यांनी मी बघेन म्हणतो !
घरी मला लागल्या झला झळा वेगळ्या चुलिंच्या
जंगलात मी कळपांतुनी बागडेन म्हणतो
तुम्ही फुलांना फुले म्हणा . . काट्यांना काटे . .
मी खुपणार्या फुलांस ‘ काटे ‘ . . फुले न म्हणतो !
लाख दिवे माझ्या ज्योतीने पेटुनि उठले
तुफानास मी पुरून आता उरेन म्हणतो !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा