बाबा पुस्तक वाचतात
बाबा पुस्तक वाचतात
त्याची कोण गंमत
त्यांच्याजवळ जायची
नाही बाई हिंमत . .
इतका जाड चष्मा
एवढे मोट्ठे डोळे
वाचताना त्यांची
नुसती मान हले . .
हूं नाही चूं s s
ह्यांचं आपलं हुप्प
दादा आणि ताई
आईसुद्धा चुप्प !
चालताना कुण्णाचा
आवाज होत नाही
आईच्या मग हातून
भांडं पडत नाही . .
ताई असते मुकी
गात असली तरी
माझं सूं सूं बंद
नाक गळलं तरी . .
वाचता वाचता बाबांनाच
हसायला येतं
तेव्हा सगळं घरच
पोटभर हसतं ! . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा