बाबांचं पुस्तक . .

बाबांचं पुस्तक
मला किनई
मुळीसुद्धा
आवडत नाही . .

 

उलटून बघते
सगळी पानं
एकदेखील
नसतं गाणं . .

 

एक साधं
चित्र नसतं
मुंगीएवढं
अक्षर असतं . .

 

गोष्टीच त्यात
नसतात खर्‍या
राक्षस नाहीत
नाहीत पर्‍या . .

 

बाबांचं पुस्तक
मला किनई

प्रतिक्रिया टाका