निता भिसे

हासले बर्‍यापैकी , डोलले बर्‍यापैकी
त्याचत्या तालावरी मी नाचले बर्‍यापैकी

आखुनी होती दिली मज पूर्वजांनी धोरणे
ठेवुनी लक्षात मी वागले बर्‍यापैकी

बदलणार्‍या वास्तवाची जाण होती ठेवली
मग नव्या साच्यामधे मज कातले बर्‍यापैकी

घडत होत्या सारख्या सत्व डिवचणार्‍या चुका
चुकत चुकतच सत्त्व माझे राखले बर्‍यापैकी

मोजले कित्येक मी बेरंग ह्या फसव्या जिण्याचे
पण स्वतःचा रंग घेउन रंगले बर्‍यापैकी

प्रतिक्रिया टाका