फुलेच वेचायाचे जरी इरादे होते ,
मात्रावृत्त :दिग्पाल
लक्षणे : एकूण मात्रा २४ ( १२+ १२ )
छंदोरचना पृष्ठ क्र.
फुलेच वेचायाचे जरी इरादे होते ,
हरेक झाडापाशी कुशाग्र काटे होते !
मला बघाया जेथे अलोट गर्दी झाली ,
बघावया गर्दीला किती गराडे होते !
अताच का गाण्याची जगास इच्छा व्हावी ?
हजार वर्षे माझे मुके पवाडे होते !
कुणीतरी साथीला हवेहवेसे वाटे . .
उतार आयुष्याचे मला इशारे होते !
विचित्र त्या कोड्यांचा मला असे कंटाळा . .
तरी , पुन्हा ऐकावे असे उखाणे होते .
अचूक त्या वाटेने कसा निघालो तेव्हा ?
अता कळे , रस्त्याला अनंत फाटे होते !
वसंत मागायाचा मला जवानी माझी . .
ऋतू मनांनी तेव्हा खरेच राजे होते !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा