फक्त खोट्यालाच . . .

वृत्त : मंजुघोषा
गण  : गालगागा गालगागा गालगागा

 

फक्त खोट्यालाच झाला त्रास माझा
अन् जगाने टाळला सहवास माझा !

 

वेळच्या वेळीच आम्ही प्रेम केले . .
वाजणारा फोन हा हमखास माझा !

 

लाख श्रीमंती इथे मिळते , तरीही
का विकू गरिबीतला उल्हास माझा ?

 

मानतो   स्वातंत्र्य मी  माझे असे की ,
ना कुणी माझा धनी . . ना दास माझा .

 

मी कुठे अमक्या  ऋतूतच बहरणारा  ?
ग्रीष्मही असतो कधी  मधुमास माझा !

 

फूल ह्यांनी फेकले . . जा , त्या ठिकाणी
आजही मातीस येतो वास माझा !

 

प्रतिक्रिया टाका