पुन्हा न चांदणे असे . .
पुन्हा न चांदणे असे पडायचे कधी . .
पुन्हा न ह्रदय एवढे जळायचे कधी !
तुझ्याविना जिवंत मी रहायचे कसे ?
सजीव पत्थरास हे कळायचे कधी ?
असा न भरवसा कुणावरीच ठेवणे . .
वसंत यायचा कधी . .फुलायचे कधी ?
अजाणता धरून हात घेतले तुझे
खुणा करून सांग , सोडवायचे कधी .
कशास आसवांस पाहिजे बजावया ?
रडायचे कुणी . . कुणी हसायचे कधी .
झुगार चेहर्यावरील पदर आडवा. .
तुझ्याच चंद्रम्यास , जग दिसायचे कधी ?
कितीक वीरमाणके धुळीस भेटली . .
रणाविना तिने तरी नटायचे कधी ?
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा