पिंजरा

पिंजरा . .

एक सुंदर लँडस्केप
रानाचं . .
कमालीचा जिवंतपणा !
जणू माझ्या हाती गावलेला
एक सजीव वनप्रदेशच . .

 

चित्राला साजेशी फ्रेम
बंगल्याची भिंतही
आता सजलेली !
पिंजर्‍यातला पोपट मात्र . .
डहुळलेला उदासपणा डोळ्यांत . .

 

कापलेल्या पंखांच्या
आणखीनच
चिंध्या झालेल्या !
हताश मनाचा
कोंडमारा करणारा
हा दुसरा एक
भिंतीवरचा रंगीत पिंजरा !

 

होय , मीच आणलेला तो फ्रेम करून . .
मीच !-
– मीच भिरकावलं
ते चित्र बाहेर . . नि
मीच उघडलं दार पिंजर्‍याचं !
———————————————————

कवी वा.न. सरदेसाई
——————————————————————

कवी श्री. ना धों महानोरसरांच्या दोन रानकविता

प्रतिक्रिया टाका