पालवी . .
निष्पर्ण मन घेऊन
रानात शिरलो
रानाला म्हणालो ,
‘ मी झडलोय
उपाय सांगशील ? ‘
रान हसलं .
मान डोलावून
त्यानं वर बघितलं
नि फाटक्या आभाळाची
एक गोष्ट ऐकविली . .
. . आंधळ्या उन्हाचा
नि वांझ मातीचा किस्सा
त्यानं
रंगवून सुनावला .
. . खो खो हसत
मग त्यानं मला विचारलं . .
पांगळ्या वार्याची
आणि तहानलेल्या पाण्याची
गंमत ऐकायचीय अजून ?
. . मी नुसता हसत सुटलो . .
मला पालवी फुटत होती !
————————————————–
कवी : वा. न. सरदेसाई
————————————————-
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा