पाखरू मनाचे माझ्या . .
अता लागले रे, माझे
पैलतिरी डोळे
पाखरू मनाचे माझ्या
पंढरी ऊडाले . . .
अखेरच्या श्वासांची ही
चालतसे दिंडी
अनंतास भेटायाला
निघाला अनादी
पश्चिमेस आता अर्धे
बिंबही बुडाले . . .
लुळ्या जिभेवरती नाचे
नाम पांडुरंग
घुमे कोरडया ओठांचा
बोबडा मॄदंग
दोन अधू दातांचेही
मंद टाळ झाले . . .
मला गावलेला अंती
सावळा विसावा
पाय आज आयुष्याचा
पुढे का पडावा
जन्मभरीच्या शून्याला
अर्थ अर्थ आले …
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा