Currently browsing category

पत्र

श्री. संजय दि. सोनवणे – चाळीसगांव – दिनांक १०/११/१९९४

श्रीयुत सरदेसाई स.न.वि.वि. ” चाळीसगावपरीसर ” दिपावली अंकतल्या आपल्या , ”  विसावा ” ही गझल व गुपित ही कविता  वाचली . रचना खूपखूप आवडल्या . कवितेचा आशय सुंदर होता. आपला संजय दि. सोनवणे

श्री. सुधाकर कदम , आरणी , यवतमाळ , दिनांक २७/१०/१९९३

श्री. वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. आपली लोकमत मधील ” कोण फुंकुन गेले ” ही गझल वाचली . मी मराठी गझलगायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही शेकडो कार्यक्रम केले आहेत . आपण आपल्या गझला गाण्याकरिता माझ्याकडे पाठवाव्यात. आपला सुधाकर कदम

श्री.विसुभाऊ बापट , दादर , मुबई , दिनांक ०४/०४/१९८९

परममित्र  वा.न.सरदेसाई यांना सस्नेह नम. वि.वि. चालू महिन्यच्या “कविताश्री ” च्या अंकात आपली उत्तेजनार्थ पारितोषिकप्राप्त ” कळीला कळीला ” ही कविता वाचली . आवडली. पारितोषिकाबद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्या सहवासात घालविलेले काही तास  भारावल्यासारखेच गेले ! सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखे होते ते क्षण आपला विरुभाऊ बापट  

श्री. प्रदीपकुमार अंचरवाडकर , बुलढाणा , दिनांक २३/०८/१९८६

वा.न.सरदेसाईजी सन्हेह नमस्कार आपली  गझल लोकमत मध्ये खूप दिवसांपूर्वी “आता हवे मलाही आयुष्य नकाराचे स्वप्नात तू दिलेले होकार पुरे झाले  ” वाचली. अन मला वाटते की ” आघात ” ह्या क्रमिक नभोनाट्याचा पहिला भाग आपण लिहिला होता. अभिप्राय AIR  जळगावला फाठविला होता. गझल बद्दल अभिनंदन. आपला प्रदीपकुमार अंचरवाडकर  

श्री. मोहिते सुभाषधर्मा , तामसवाडी , ता. पारोळा , दिनांक १०/०४/१९९२

कविवर्य सरदेसाईह्यांना सप्रम नमस्कार लोकमतमधील रंगमैफलीचा ह्या सदरातील ” नव्याने लाजते ” खूप आवडली . आपला मोहिते सुभाषधर्मा

श्री.राजा मिसर , रावेर , जि. जळगाव , दि.१९/११/१९९०

श्री.आदरणीय सरदेसाईजी , . . .  आपले गझलेतील स्थान आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहे. दिनांक १९ ला आपला दूरदर्शनवर कार्यक्रम पाहिला. आवडला. आपला राजा मिसर

श्री. यशवंत गोडबोले , बोरिवली (प.) – दिनांक -१९७०

सप्रेम नमस्कार तुम्ही १९७० च्या नवयुग स्पर्घेच्या दोन्ही दालनात यश मिळवण्याचा एकट्यानं विक्रम केला आहे. कवितेबद्द्ल (इंगित) गौरव करावा तेवढा थोडाच होईल. ” कलमाच रोप ” ह्या कथेनंही मनाला चटका लावला आपला यशवंत गोडबोले

श्री. रमेश डी. चव्हाण , नवापूर , जि.धुळे , दिनांक ०१/०९/१९९०

प्रिय कविमित्र श्री. वा.न.सरदेसाई ह्यांना स.न. प्रथमतः तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! मुंबई दूरदर्शनवर दिनांक ०१/०९/१९९० रोजी ” काव्यकुंज ” ह्या कार्यक्रमात तीन दर्जेदार , आशयघन व अप्रतीम शैलीत आपण तीन रचना सादर करून श्रोत्यांची जी दाद मिळविली त्याबद्द्ल खरोखरच अभिमान वाटतो. आपला रमेश डी. चव्हाण

डॉ.आश्विनी घोंडगे (Lecturer in English SNDT College Arts&Comm.-Pune) – दिनांक ०१/०९/१९८५

श्री.वा.न.सरदेसाई स.न.वि.वि. आपली कविता ‘च्याऊ-म्याऊ ‘ दिवाळीअंकासाठी स्विकारली आहे. आपले लिखाण चांगल्या दर्जाचे असते म्हणून मी पुणे येथे भरणार्या  बालकुमार साहित्य संम्मेलनाच्या परिसंवादासाठी मुद्दाम आपले नाव दिले आहे.आपला मनोदय कळवावा म्हणजे रीतसर निमंत्रण पाठवत आहे. आपली डॉ.आश्विनी घोंडगे

श्री.गोपाळ सुर्वे – मुंबई – दिनांक ०२/०८/१९७२

महोदय , आपली ज्ञानदूत दिवाळीअंक १९७१ मधील ‘सांगती गीता भगवंत’ ही कविता वाचली. तिची रचना फारच आवडल्यामुळे आम्ही गायनाच्या दृष्टीने स्वरबद्ध केली आहे व ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ मध्ये रेकॉर्ड करण्याचा विचार आहे तरी त्याकरिता आपली परवानगी मिळावी ही विनंती. आपला गोपाळ सुर्वे  

श्री.वि.ना.उरणकर – डोंबिवली – दिनांक २०/११/१९९०

प्रिय वा.न. बरेच दिवस तुम्हाला पत्र लिहीन म्हणत होतो. काल TV वर तुमची नाटिका पाहिली आणि लिहायचे नक्की केले. एक चांगली नाटिका दिल्याबद्द्ल अभिनंदन ! वास्तविक मी तुमच्या गझलांचा चाहता. निरनिराळ्या मासिकांतून आपल्या गझला दिसल्या की मी त्या आवडीने व बारकाईने वाचीत असतो. आपल्या ‘सन्मान’ या गझलेतील काही शेर माझ्या वहीत आहेत . या गझलचा मतला निव्वळ लाजबाब. तुम्हाला सर्वप्रकारच्या लेखनात गती आहे . इतरत्र मोठे यश आपणास लाभो परंतु गझलवरचे आपले प्रेमही कायम राहो. आपला वि.ना.उरणकर

श्री. आनंदकुमार आडे – यवतमाळ – दिनांक ०९/१०/१९९७

सह्रुदयी श्री.वा.न.सरदेसाई मी ३१/०७/१९९७ ते ०९/०८/१९९७ पर्यंत मुंबईला होतो. मुंबईतील गझल शिबिरात तुम्ही मनाने सहकार्य केलेत. मी तुम्हाला सुह्रुद – सुह्रुदय संबिधिले आहे ते उगीच नव्हे . तुमच्या स्वभावात न आटणारा आपुलकीचा झरा आहे . निखासता आहे. very very plain by Heart आहात तुम्ही आणि तशीच तुमची गजलकलम आहे. तुमच्या गझलांमध्ये मुलायमपणा आहे.   त्या दीर्घ भाषणांचा सारांश सांगताना माझाच शेर त्यांच्या ओठांवरून गेला  ढाल पाठीस आहे तरी अंग का चोरती कासवे प्रतिमा आणि प्रतीक सुयोग्य आहे. थांब टोचू लागली नखे आता …

श्री.श्रवणकुमार जे.शाह – शहादा – दिनांक २९/१०/१९८०

सुप्रसिद्ध साहित्यीक , कवी , नाटककार आणि आता लोकनाट्यकार श्री. वा.न.सरदेसाई यांना शहादयाहून श्रवणकुमारचा नमस्कार. ‘ बकुळेचा दागिना ‘ ह्या लोकनाट्यास प्रथम पारितोषिक मिळाले त्याबद्द्ल अभिनंदन . आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो ! आपला श्रवणकुमार शाह