ना आरशाला धड स्वतःचा चेहरा

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : वैखरी
लक्षणे : गागालगा गागालगा गागालगा
छंदोरचना पृष्ठ क्र. १७३

ना आरशाला धड स्वतःचा चेहरा
हा इतर मुखड्यांचा किती पण हावरा !

खुणवीत झुळुकांनी दिली परवानगी . .
दे , हात हाती . . ये , अशी बिलगू जरा .

कळतो , तुझ्या ह्या लाजण्याचा अर्थ ही . .
ऐकायचा मज शब्द आहे लाजरा !

दिसती न ह्या वस्तीत तेव्हाची घरे . .
मग कोणता हा हाक मारी उंबरा ?

दुनियाच सारी जाहली नकली जिथे ,
ना ओळखू ये , कोण खोटा अन् खरा .

.

प्रतिक्रिया टाका