नाटकातलं घर . .

नाटतलं घर किनई
दिसतं किती छान
सारे बघत बसतात
वर करून मान !

 

खुर्च्या किती सुंदर
सोफासुद्धा मस्त
गुळगुळीत टीपौय
जवळच असतं . .

 

दारखिडक्यांवरचे
पडदे पण झकास
टांगलेल्या दिव्यांचा
घरभर प्रकाश . .

 

हे घर कधीही
गप्प नाही बसत
बडबड करून कुण्णाचं
तोंड नाही दु:खत . .

 

– अशा ह्या घराला
फक्त तीन भिंती
अंगावरती घरच
पडायची भिती . . !

 

 

प्रतिक्रिया टाका