नक्षत्रांची मैफल झडली . . ऐकियले . .
सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : माल्यश्री
लक्षणे : गागागागा गागागागा गागागा
छंदोरचना पृष्ठ क्र. १५६
नक्षत्रांची मैफल झडली . . ऐकियले . .
तेथे माझे गीत कुणीसे गायियले !
कमळाची असुनी रातमिठी भ्रमराला ,
मन त्याचे बाहेर कुठेसे राहियले !
मोहरलेल्या झाडांना तू पूस कधी . .
मागील ऋतू कोणी कैसे सोशियले .
मनरंगारी जर नव्हता तुझिया ध्यानी ,
रंग कुणी लाजेचे गाली रेखियले ?
तू निघताना जीभ विसरली शब्द तिचे . .
मी अश्रूंना मग बोलाया लावियले !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा