नको आता कुणाचेही मला काही . .

अक्षरगणवृत्त : प्रसूनांगी
गण : लगागागा लगागागा लगागागा

छंदोरचना पृष्ठ क्र. १७२

 

नको आता कुणाचेही मला काही . .
मला हाकारती येथे दिशा दाही !

 

कशाला आण तू घेतेस प्रेमाची ?
कुणी वेड्या मनाची द्यायची ग्वाही ?

 

परागंदा किती झाले . . किती ‘ गेले ‘
तरीही कागदोपत्री ॠतू साही.

 

कुठे मी ‘ अंतरा ‘ चा लावतो चष्मा ?
मला ना दूरचा तो . . दारचा हाही !

 

नसे लागावया भांडेच भांड्याला . .
खरी शांती रित्या माझ्या घरी राही !

 

.

प्रतिक्रिया टाका